प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

कसोटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचा मृत्यू झाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  11 नोव्हेंबर  :-   काही दिवसांआधीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं जीममध्ये वर्क आऊट करत असताना निधन झालं. आता टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचं आज सकाळी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं मृत्यू झालाचं सांगण्यात आलं.

अभिनेता सिद्धांत हा 46 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. सिद्धांतचं खरं नाव हे आनंद सूर्यवंशी असं आहे. त्यानं काही दिवसांआधीच त्याचं नावं सिद्धांत सूर्यवंशी असं केलं होतं. अभिनेता जय भानुशालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धांतच्या निधनाची माहिती दिली.  सिद्धांतचा फोटो शेअर करत भाई तू आम्हाला सोडून फार लवकर निघून गेलास असं म्हटलं आहे.

हे देखील वाचा :-