Jacqueline Fernandez :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीमुळे चर्चेत आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली 22, ऑक्टोबर :-  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या  अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जॅकलीनला आज कोर्टात हजर करण्यात आल होते. जॅकलीनच्या अंतरीम जामिनात 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, ईडीने  तिच्या जामिनाला विरोध केला आहे. 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात  जॅकलीन हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असं ईडीने कोर्टाला सांगितलं. तसेच ती देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती, असा गौप्यस्फोटही ईडीने कोर्टात केला आहे.

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.

हे देखील वाचा :-

 

bollywoodEDJacqueline Fernandezmoney laundering