एमआयटीच्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली 1 ऑक्टोबर :- भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि थियटरच्या अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म ‘परीह’ला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

हे पण वाचा :-