जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. 21 जून : जागतिक योगा दिनानिमित्त सकाळी ८ ते ९.३० वाजता महाएनजीओ फेडरेशन, पुणे यांचे सहकार्याने आणि अभिनव बहुद्देशीय कला मंच गडचिरोली तसेच नेहरू युवा केंद्र, गडचिरोली व आर्ट ऑफ लिव्हिंग,शाखा- गडचिरोली यांचे वतीने जिल्हा कारागृह, गडचिरोली येथे ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे उद्घाटन जिल्हा युवा विकास अधिकारी अमित पुंडे यांचे हस्ते व प्रमुख पाहुणे सचिन अडसुळ, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली यांचे उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ब्रम्हा चोपकर, तुरुंगाधिकारी, निमगडे, तुरुंग अधिक्षक, गडचिरोली, मिलींद उमरे, योग प्रशिक्षक, अंजली कुळमेथे, योग प्रशिक्षक, माधुरी दहीकर, योग प्रशिक्षक, वर्षा मनवर, योग प्रशिक्षक अकिल शेख, सचिव-अभिनव बहुद्देशीय कला मंच, गडचिरोली शंकरराव मोगरे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गडचिरोली जिब्राईल शेख, मयुर गड्ढमवार, नुर खा पठाण, अतुल गोस्वामी, तुरुंग कर्मचारी, कारागृहातील कैदी उपस्थित होते. शिबीरातील उपस्थितांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले.

 

हे देखील वाचा :

नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते

विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री विजय वडेट्टीवार

बळजबरीने मोबाइल पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना मिळाले यश

 

gadchiroli policelead storyworld yoga day