‘आम्हाला अन्न हवे,तंबाखू नाही’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राजुरा दि,६ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती , पंचायत समिती राजुरा तर्फे ‘We need food, not Tobacco – आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ‘ या जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी  तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम राबवुन चित्र, पोस्टर्स, कथा, घोषवाक्ये व बॅनरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांना तंबाखूच्या भयावह दुष्परिणामा- विषयी रंजकपणे माहिती देण्यात आली. सदर उपक्रम मनिष अशोकराव मंगरूळकर (शिक्षक )यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिथुन मंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर डाखरे, ममता शालिक लांडे, सदस्या, कल्पना गंगाधर कोडापे , सदस्या,संजय बोबाटे , आनंदराव डाखरे , लताबाई देवगडे , गंगाधर कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिण –

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष माहिती विषद केली, तंबाखूचे सेवन केल्याने शरीरातील विविध भागात जसे- तोंड , घसा, स्वरयंत्र, फुफ्फुस, आतडे, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी भागात कर्करोग होत आहेत. संपूर्ण जगात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण आपल्या भारतात आढळून येत आहेत आणि तंबाखू ही या सर्व रोगांची जननी आहे. भारतात दरवर्षी जवळपास १० लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगाने होत आहे. तरीही आज संपूर्ण भारतात २८.६ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करत आहेत, तर  महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे. मुलांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानामुळे हवा दूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा बाधित होतात. ‘तंबाखू सोडा आणि नाती जोडा ‘ तसेच ‘आरोग्याचा पहिला धडा, तंबाखूला ‘नाही’ म्हणा ‘ हा मोलाचा सल्ला उपक्रम प्रमुख  मनिष मंगरूळकर यांनी उपस्थितांना पटवून दिला.

हे देखील वाचा,

 

‘सर्च’मध्ये होणार तरुणांसाठी ‘कृती निर्माण’ शिबीर

रोहा प्रेस्कलबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड

 

मनिष अशोकराव मंगरूळकर