जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी संस्थाध्यक्ष, सचिवांसह पाच जणांवर गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव अॅड. विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती. चौकशीच्या आधारे सुरुवातीला मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कोवासे आणि सचिव अॅड. विश्वजित कोवासे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच बाल न्याय अधिनियमातील कलम ७५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Japtalai hostel issueSnekh byteआदिवासी विकास मंत्री
Comments (0)
Add Comment