भाजपाच्या वतीने आणीबाणी काळात २१ महिने तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार

चामोर्शी येथे आणीबाणी काळादिवसानिमित्य उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चामोर्शी, दि. २५ जून : काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपूर्ण भारतभर आणीबाणी लागु करून लोकशाहीची हत्या करण्यात आली. मानव अधिकाराचे हणन करून देशवासीयांवर विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणुन २५ जून हा दिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीने  साजरा करण्यात येत आहे.

या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या आणीबाणी काळात ज्या समाजसेवक, नागरिक, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. अशा नागरिकांचा सत्कार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील ही समाजसेवक, नागरिक कार्यकर्त्याचा सत्कार आज करण्यात आला.

आणीबाणी काळादिवसानिमित्त चामोर्शी येथे आम. डॉ देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शीच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील दोन सामाजिक कार्यकर्त्यांचा खा. अशोक नेते, आम. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला भाजपचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जीपचे कृषी सभापती तथा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, पंस च्या उपसभापती वंदनाताई गौरकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखिल वाचा :

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

भाजपा कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांना आदरांजली

 

 

ashok netelead story