बार्टीच्या वतीने संविधान दिन निमित्ताने जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 24 नोव्हेंबर :-  सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) जिल्हा गडचिरोली समतादूत प्रकल्पाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२२२ संविधान दिनापासून पासून ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिन पर्यंत जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

भारतीय संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतिय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्या प्रती जागरुकतेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी संविधानातील मुलभूत तत्व या सामाजिक समता, स्वातंत्र्य, न्याय या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील. तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन , हिंदू कोड बिल, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह कायदा व इतर संविधानातील नैतिक मूल्याची जाणीव, समाज कल्याण योजना , बार्टीच्या योजना ची माहिती देणे ,संविधान रयाली काढणे, इत्यादी कामे बार्टी चे समतादूत करणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी दिली.

हे देखील वाचा :-

पत्रकारांसाठी ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करा !

आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

Barticonstitution day weekGadchiroli