दोन मातांसह १३ बालमृत्यूस जबाबदार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा – ग्रामसभा नवेझरीची निवेदनाद्वारे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – शालीकराम कराडे

गडचिरोली, दि. २३ मार्च: नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल कोरची तालुक्यातील नवेझरी गावात मानसेवी वैद्यकिय अधिकारी विद्या बोरकर (नाकाडे) ही मुख्यालयी न राहता वेतन उचलुन आपले उखळ पांढरे करुन मोबदल्यात ४ वर्षात २ माता व १३ बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर आदिवासीबहुल गावातील जनतेचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. माता व बाल मृत्युचे दर कमी करण्यासाठी शासन व प्रशासन फारच गंभीर असुन यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात निव्वळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यावधी खर्च करीत आहे. मात्र या वेतनाचा विनिमय योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालेली आहे.

आरोग्य विभागाने कोरची तालुक्यातील नवेझरी, आंबेखारी या ठिकाणी मानसेवी वैद्यकीय  अधिकाऱ्यांना पूर्ण वेळेकरिता सेवा बजावण्यासाठी नियुक्ती करण्यात आले पण अद्यापही मानसेवी वैद्यकीय अधिकारी नवेझरी/आंबेखारी ला कधीच गेले नाही. गरोदर मातेला योग्य वेळी योग्य आहार मिळायला पाहिजे, गरोदर मातेची नियमित तपासणी झाली पाहिजे, शासनाकडून दिला जाणारा सकस आहार मातेला नियमित वेळेवर मिळायला पाहिजे. या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गावात भेटी द्यायला पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने नवेझरी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता डॉ.  विद्या बोरकर यांची नियुक्ती केलेली आहे.

डॉ. विद्या बोरकर यांची नियुक्ती सन २०१५ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आली आहे. या काळात डॉ. विद्या बोरकर नवेझरी येथे कधीच गेल्या नाहीत. डॉ. विद्या बोरकर यांनी गावातील गरोदर मातांना वेळोवेळी आरोग्यसेवा दिल्या असत्या तर, २ मातांसह १३ बालकांचा म्रुत्यु झाला नसता. त्यामुळे येथे नियुक्ती करण्यात आलेले मानसेवी वैद्यकीय अधिकारी आणि तालूका वैद्यकीय अधिकाऱीच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी नवेझरी येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी सिंगला, गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत गोयल, गडचिरोली, आणि पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना ग्रामसभेचे अध्यक्ष हरीचंद्र हिळामी, सचिव रितेश कोल्हे, बीसन नरेटी, मंदारमाला काटेंगे, सुंदर बोगा, मंगला हिळामी, कांडे हिळामी, संदीप मडावी, गंगाराम कल्लो, तानसिंग कुमोटी, गणेश बोगा, रामसिंह हिळामी, राजेश हलामी, शेषराम कोरचा, अमरसिंह वट्टी, अमित केरामी आदी उपस्थित होते.

Navezari
Comments (4)
Add Comment
  • sameer

    ही माहिती देणार कोणता पत्रकार आहे.. त्याचे नाव कळु शकेल का.. अतिशय चुकीची माहीती छापलेली आहे.. लोकस्पर्श टीम , बरोबर योग्य रीत्या माहीती तपासुन छापत चला… नाहीतर तुमच्याच पत्रकारबंधु व तुमच्या दैनिकाचा दर्जा राहणार नाही..

    डाॅक्टर लोक जी सेवा देत आहेत.. त्या सेवेचा सन्मान करत चला.. असल्या वाह्यात पेपरबाजी चांगली नाही..

    .. पत्रकार पैसे खाऊ आहे का ? ह्याची शहानिशा करा.. जर पैसे खाऊ असेल तर काढुन टाका…

    म्हणे सदोश मनुष्यवध.. पत्रकार महोदय , तुमच्या पुज्यनिय वडीलांनी सुद्धा हे बघितल होत का.. ??त्यामुळे आधी योग्य अभ्यास करुन लिहीत चला.. उचलली जिभ , लावली टाळ्याला असे होवु नये..
    हे आधी बघा..की माता म्रुत्य दर भारतात काय आहे ते.. .. सध्या ते ११३ प्रति १००००० इतके आहे..
    कश्यासाठी सदोश मनुश्यवध. इथल वाचुन तिथ जोडता का..? बातमी कशी छापावी हेही लोकस्पर्श च्या पत्रकाराला येवु नये ही सुद्धा शरमेची बाब आहे..

    पत्रकाराचे नाव सांगा खोटी माहीती टाकली म्हणुन तुमची तक्रार करायची आहे..

    _ समीर गहाणे जिल्हा भंडारा.. ( उगाच अस वाटायला नको की कुणी लिहील आहे म्हणुन.. . फेसबुक वर प्रोफाईल आहे माझी , बघायची असल्यास.. )..

    rascal..

    @ loksparsh.. चुकीची बातमी डाॅक्टरांविरुद्ध टाकु नका.. else will take legal action against you..

    # खोटी बातमी छापल्याबद्दल माफीनामा सादर करा.. नाहीतर बातमी डिलीट करा.. नाहीतर मानहानीचा दावा टाकावा लागेल..

    शरम वाटायला पाहीजे..

    • Loksparsh Team

      डॉ.समिरजी गहाने आपला लोकस्पर्श च्या
      https://loksparsh.com/…/demand-for-gram-sabha…/11366/
      या बातमीवरील प्रतिसाद आमच्या टीम ने वाचला आहे
      1)आमची बातमी चुकीची नाही.आणि आपण बातमी नीट वाचलेली दिसत नाही.त्या बातमीत ज्या आमच्या प्रतिनिधी ने बातमी दिली त्याचे नाव नमूद आहे.
      2)आम्ही डॉक्टरांनी दिलेल्या सेवेचा सन्मान च करतो..या मध्ये कुठे ही दुमत नाही. कोरोना काळात आरोग्य विभागाने फ्रंट वारियर ची भूमिका निभावली आहे आणि निभावत आहे.
      मात्र,आरोग्यसेवेत आजही बहुतांशी डॉक्टर लोक गलेलठ्ठ पगार घेऊन दुर्गम भागात सेवा न बजावता आपले खासगी दवाखाने थाटले आहे..दुर्गम भागातील लोकांना आरोग्यसेवा कोण देणार??ती जबाबदारी कुणाची?? मुख्यालयी न राहता सेवा न बजावता माता ,बालमृत्यू झाले तर जबाबदारी कोणाची??पत्रकारांची का??आम्ही ग्रामसभेने केलेल्या तक्रारी वर बातमी केली आहे .दुर्गम भागातील लोकांना आजही आरोग्यसेवा व्यवस्थित मिळत नाही.गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात वेळेवर उपचार न अनेकदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.भामरागड सारख्या भागात जारेगुडा येथील मागील वर्षी गरोदर मातेला 23 किमी ची पायपीट करून प्रसूती साठी लाहेरी ला यावे लागले होते. दुसऱ्या गरोदर महिलेच्या 5महिन्याचा बाळ वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावला..हे दुदैव आहे.
      3)आमचे कर्तव्य आम्ही चोख बजावतो आहे.शासन ,प्रशासनाच्या चुका आम्ही दाखवू नाहीतर कोण दाखवणार..आमचा तो हक्क आहे .आमच्या हक्क आणि कर्तव्यप्रति जागरूक आहोत.जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे . प्रशासन व्यवस्थेतील त्रुटी ,गैरकारभार ,अव्यवस्था दाखविली म्हणजे आमचा प्रतिनिधी पैसे खाऊ होतो हा तुमचा आरोप निराधार आहे.आमचा प्रतिनिधी योग्यपद्धती नेच काम करतो आहे.त्यावर आम्हाला तिळमात्र शंका नाही.त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
      पत्रकार हा समाजासाठीच काम करतो .समाजातील चांगुलपणा सोबत वाईटपणा आहे तो सुद्धा आम्ही लेखणी च्या माध्यमातून टिपतो..म्हणजे समाजात जे छान घडत असलं की,तो सुद्धा आम्ही दाखवतो..
      4)आपण डॉक्टर पेशात आहात व्यावसायिक आहात त्यामुळे आपण आपली भाषा पत्रकारांच्या संदर्भात कशी वापरली पाहिजे याची मला आपल्याला शिकवण देण्याची गरज पडू नये.आपण आपली सेवा चोख बजावा.आम्ही डॉक्टर चे काम (उपचार) करू शकत नाही कारण आम्हाला त्या क्षेत्राची माहिती नाही त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी करावी याबाबत दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीनी शिकवू नये.जे पत्रकारितेचे बेसिक ethics आहेत त्यावरच आम्ही काम करतो आणि कामात सुधारणा करतो.

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
      दिलेल्या फीडबॅक बद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद !!!! ??

      टीम लोकस्पर्श.

  • sameer

    प्रतिसादाला उत्तर देणे मला गरजेचे वाटते.. डाॅक्टरी प्रोफेशनला असेच काही पत्रकार आजकाल बदनाम करायला लागलेत हे जिकडे तिकडे दिसुन येत आहे..

    चांगल्या गोष्टीचा आदर व्हायला पाहीजे , पुस्तकी भाषा व सत्य ह्यात तफावत असते.. नाव न देताही बातमी देता आली असती.. जर गोष्ट वरीष्ट किंवा इतरांच्या लक्षात आणुन द्यायची असते तर नावे देत नाहीत.. ह्यात न्यायालयाचा एक नियम आहे तो सांगत बसत नाही..

    जास्त डाॅक्टरांची मागणी करा.. कोरोना काळात सरकारी डाॅक्टरांचे कामाच्या नावाखाली शोषण सुरु आहे.. ते दिसणार नाही.. हे दिसलय का.. कोरोना योद्धा , कोरोना योद्धा केल म्हणजे होत नाही..

    त्या उपकेंद्रात दोन सिस्टर असतात त्या नसतिल तर त्या आधी भरायला लावा…

    एकाच डाॅक्टरने इथेही काम करावे, तिथेही करावे, कोरोना ही बघावा,सगळच त्यानेच बघावा अस नसते..

    जर पैसे घेवुन काम करणारे पत्रकार आजकाल वाढीस लागले आहेत, त्यातलाच हा प्रकार दिसतो… एखाद्याने पैसे दिले तर ठीक नाहीतर मग काहीतरी बातमी द्यायची हा प्रकार स्वरोजगाराचा साधन होतांना दिसत आहे..

    त्या बातमीत मुद्दाम नाव लाल अक्षरात लिहीणे ह्यावरुन कोणता प्रकार आहे ते समजुन येते..

    – जिथे एक ठेकेदार लाखोंचे ठेके घेवुन पैसे कमावतो ते दिसत नाही, जिथे एक नेता करोडो कमावतो ते दिसत नाही…पण सरकारी डाॅक्टरांना भेटणारा ४०-५० हजार पगार गलेलठठा वाटतो..वाह.. ( टाळ्या )..
    सरकार ने हा पगार चांगला जास्त करावा २ लाख तरी.. मग तरी कुणी प्रायवेट केल तर नककी बोला..उद्या असे छापु नका की सरकारी डाॅक्टर हा विमानाने दवाखान्यात येत आहे म्हणुन व त्यावर कार्यवाही करुन सदोश मनुष्यवध दाखल करा म्हणुन.. होवु शकत काही सांगता येत नाही. पैसे जर भेटले नाही होवु सुद्धा शकत..
    सरकार स्वतः भ्रष्ट असते,१०० कोटीची खण्डणी मागते दर महीन्याला , जर डाॅक्टरने स्वत:च्या ज्ञानाचा वापर करुन , सेवा देवुन कामाचे माफक पैसे घेतले तर तेही नको आहे का.. ? .. म्हणे प्रायवेट करायच नाही.. मग सरकारने द्यावेत ना लाखभर. का आम्हाला आमचा परीवार नाही.. पोर नाहीत.. गरजा नाहीत..

    तो भाग दुर्गम आहे , ह्यात त्या डाॅक्टराचा काय दोष.. तिथे शाळा नाहीत, चांगली सोय नाही.. मग डाॅ ने आपली पोर बार वार्यावर सोडायची का ? त्यांच काही भवितव्य नाही.. तरी सेवा देत आहेत हे सुद्धा कुणी बघायला तैयार नाही.. आधीच तिथे कुणी काम करायला तैयार होत नाही.. ते का होत नाहीत, ह्याची कारणे शोधुन त्यात बदल घडविता येईल का हे बघा..

    ते जे पत्रक सादर केलय , त्यात पुर्ण सहया नाहीत.. मला तर वाटते की ते पत्रक त्या सदर पत्रकारानेच लिहुन दिल असेल..ते असुही शकत.. तेच नक्की असेल..

    कच्चे रस्ते बांधले तर चालतात, त्यात अपघात होतो तेही चालतात. पण अपघात झाल्यावर कुणी व्यक्ती मेला तर मात्र डाॅक्टर जबाबदार.. मग पेपरात बातमी द्यायची की डाॅक्टरच्या चुकीमुळे रुग्ण दगावला.. डाॅक्टर कडे का जादुची कांडी असते का ?

    पायपिट शब्दाचा अर्थ पायी चालणे असा होतो.. जर तितक अंतर जर पायी जाव लागत असेल तर सरकारल दोन जोडे मारायला हवेत की इतक्या वर्षात एक साधी रुग्णवाहीका त्या भागात उपलब्ध करुन दिली नाही.. आत्ता हे म्हणु नये की डाॅक्टरने स्वतःच्या गलेलठठ ( ३०-४० हजार पगारातुन ) एक रुग्णवाहीका सुरु करावी व बाकीची साधने विकत घ्यावी.. साधने पुरवा, स्टाफ पुरवा, पुर्ण प्रोटेक्शन द्या.. दोन रक्षक तिथे द्या..

    जर डाॅक्टर ला काही झाल तर जबाबदार कोण ?

    जर साधने उपलब्ध नाहीत तर डाॅक्टर झाडफुक तर करु शकत नाही.. की हे रुग्णा, पटकन बरा हो बर तु.. ओम भट स्वाहः.. अस वैगेरे काही.. जर रुग्ण सिरिअस असेल तर वर रुग्ण पाठवावा लागतो.. ह्याला इंग्रजी मध्ये patient refer करणे असे म्हणतात..

    जर एखादा बालम्रुत्यु होतो तर तो एका दिवसात होत नाही.. त्यासाठी खूप कारण महत्वाची असतात.. त्या गरोदर मातेचे वजन किती होते, तिला सकस आहार गरोदरपणात भेटत होता की नाही, तिचे रक्त बरोबर आहे ना, जन्मलेल्या बाळाचे वजन किती, त्याला योग्य आहार भेट आहे का,ते व्यवस्थीत दुध तर पित आहे ना.. किंवा त्यात वेगळ व्यंगत्व तर नाही ना.. किंवा बाळ कुपोशीत तर नाही ना..जर कुपोशित असल्यास त्याला वर पाठवुन त्यावर आधीच उपचार करण्यात आले का.. ही जबाबदारी पालकाची सुद्धा असते…

    सर्व बाबीचा विचार करावा लागेल.. एकट्या डाॅक्टर वर ढकलुन कस चालणार.. त्या भागात सर्व बाबींचा विकास व्हावा..

    तिथे आधीच दुर्गम भाग आहे..व तिथे सुद्धा डाॅक्टर लोक सेवा देत आहेत.. ही कौतुकाची बाब आहे.. उलट त्यांच स्वागत व्हायला पाहीजे..

    बालक म्रुत्यु दर कमी होत आहे.. ही चांगली बाब आहे.. जरी साक्षात देवाला जरी आणले तरी बालम्रुत्यु शुन्य करता येणार नाही.. काही गोष्टी ह्या निसर्गाच्या हातात असतात..

    व अमेरीका , किंवा अन्य देश इथेही माताम्रुत्यु होतात.. तर त्यांना काय म्हणायच.. तिथल्या कुणी पत्रकाराने बालम्रुत्यु झाला म्हणुन सरळ डाॅक्टर ला दोष दिलेल आढळत नाही..त्यांना आपल्या देश्यातील काही पत्रकारांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहीजे असे क्रुपया कुणीतरी सांगा बर त्यांना ..
    कोणत्याही रुग्णालयात जा, प्रयत्न करणे डाॅक्टरच्या हातात असते.. तो प्रयत्न करत राहतो..

    गडचिरोली मध्ये लोक झाडफुक वर जास्त विश्वास ठेवतात.. अशी कुणाची प्रतिमा मलिन करण्यापेक्षा त्यात जनजागरण आणल तर बरे होईल..

    व खरी पत्रकारीता जर करायची असेल तर गावातिल जी लोक चांगली कामे करतात त्यांना पकडुन उगाच त्रास देण्यापेक्षा जे मंत्री संत्री आहेत , त्यांचे भ्रष्टाचार , कारस्थाने समोर आणत चला..तिथे जास्त गरज आहे.. नाहीतर नुसती वाहवा करत राहता.. व तेच वाहवा धारक मग १०० कोटी चा महीन्याला घपला करतात.. अशी लोक तुमच्याही जिल्ह्यात असतिल. ती शोधा.. त्याला खरी पत्रकरीता म्हणता येईल.. जी तुम्ही वर सांगितली आहे..

    जी डाॅक्टर लोक चांगली कामे गडचिरोली जिल्ह्यात करत आहेत..त्यावर चांगले लेख सुद्धा छापत चला… हे मात्र जमणार नाही..

    आशा करतो की पुढील वेळी तुम्ही जे वर सांगितल आहे त्यापैकी निदान एक तरी करोडोचा घोटाळा बाहेर आणाल.. ते स्वागतार्ह राहील..

    व हे असले सदोश मनुष्यवध वैगेरे शब्द जपुन वापरा.. नाहीतर न्यायालयिन कार्यवाही करावी लागेल..हे सगळ इतक सोप आहे अस समजु नका.. ( हे जितक्या ताकितीने बोलत आहे, तितक्याच ताकतिने कराव लागेल.. पुढील वेळी काळजी घ्या.. असे शब्द खपवुन घेतले जाणार नाही.. )..

    आजच्या काळात सर्वांनी आपण प्रामाणिकरित्या काम करतो की नाही हे बघणे आवश्यक… आजकाल पत्रकारीता कशी होते हे वेगळे सांगायची गरज भासत नाही..

    # अंधेरी नगरी , चौपट पत्रकारीता.. ( बदल घडविणारी पत्रकारीता करायची की पैसे खावु पत्रकारीता करायची ह्यावर विचार करा.. एखाद्याची प्रतिमा मलिन करुन तुम्ही नोबल पुरस्कार विजेते होत नाहीत.. )…

    # मिरची झोंबु शकते.. आता हे लिहील म्हणुन इथेही सदोश मनुष्यवध सारख काही करु नका.. म्हणजे झाल.. पत्रकारीतेचा एखादा कोर्स किंवा डीग्री असावी , आजकाल उठसुठ कुणीही पत्रकार होत आहे.. हास्यास्पद वाटते हे.. पण जावुद्या.. आता दुसरा कुणी बघितलाय का.की पैसे दे म्हणुन , नाहीतर सदोष मनुष्यवध करतो म्हणुन.. तेच जमु शकत… जस आधीच म्हणालो स्वयंरोजगार..

    हे approve करायची हिम्मह आहे का ? हे माहीत नाही..

  • sameer

    शालिकराम कराडे हे नाव हवे होते, सदर व्यक्तीने प्रतिमा मलिन केल्याबद्दल १० लाखाचा दावा दाखल करायचा आहे… त्यातही रितसर चौकशी न करता नाव दिलेल आहे.. हा मुद्दा प्रमुख आहे..