नामांकित डॉक्टरचा खून ? पत्नीवर संशय मुलाने केली फिर्याद .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक, 14,ऑक्टोबर :-  हल्ली उच्च शिक्षित लोकांमध्ये स्वैराचार फोफावत चालला आहे. संस्कार आणि संस्कृती विसरली जात आहे. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्याचेच पर्यवसान मग घरस्फोट, किंवा तिहेरी प्रेम प्रकरण यात होत आहे. नाशिकमध्ये ही अशी घटना घडल्याची बातमी आली आहे.

नाशिकमध्ये एका नामांकित डॉक्टरची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या डॉक्टरची गेल्या ३२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सतीश देशमुख यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर सतीश देशमुख यांच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. म्हसरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

पत्नीनेच संपवलं ?

डॉ. सतीश यांच्या मृत्यूमागे पहिला थेट संशय त्यांच्याच पत्नीवर घेण्यात आला आहे. पत्नीने डॉक्टर सतीश यांना भुलीचं औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. खुद्द डॉ. सतीश यांनी आपल्या मुलाला याबाबत सांगितलं असल्याची माहिती समोर आलीय. डॉक्टर सतीश यांच्या मुलानेच डॉ. सतीश यांच्या पत्नीविरोधात पोलिसांत फिर्याद दिली होती. डॉक्टर सतीश यांना पत्नीनेच जीवे मारण्याचा प्रयत्न का केला? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

पत्नीवर काय आरोप ?

डॉक्टर सतीश देशमुख यांना पत्नीच्या अनैतिक संबंधांची कूणकूण लागली होती. त्यामुळे त्यांचा पत्नीशी वाद झाला होता, असंही सांगितलं जातंय. या वादानंतर पत्नीने पतीचा काटा काढण्यासाठी हत्येचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आलाय. देशमुख यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने डॉक्टरला रुग्णालयातीच एका खोलीत डांबून ठेवलं होतं. त्यानंतर भुलीचं इंजेक्शन देऊन त्यांना जीवे मारहण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराची माहिती डॉक्टर देशमुख यांनीच आपल्या मुलाला दिली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाने म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गेल्या ३२ दिवसांपासून डॉक्टर सतीश देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अखेर उपचारादरम्यान आता त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. या संपूर्ण प्रकरणी म्हसरुळ पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

हे देखील वाचा :-

टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

 

 

doctor's murdernashik