टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

केएल राहुलकडे कर्णधारपद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 13 ऑक्टोबर :-  येत्या काही दिवसांत टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारतीय प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत.

हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे 17 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे. रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.

हे पण वाचा :-

 

capton changeT 20 world cupteam