चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ७ सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकीबाबत कोणास दावा करावयाचा असल्यास त्यांनी न्यायालयाचे आदेश व अन्य कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. पाटील यांना एक महिन्याचे आत सादर करुन वाहनाचा ताबा घ्यावा. अन्यथा, सदर वाहनाचा ई-लिलाव करुन लिलावाद्वारे प्राप्त रक्कम शासन जमा करण्यात येईल.

जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांची यादी या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिक्षक संजय पाटील यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

विश्वजित कदमांची थोरातांकडून मनधरणी

थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी राज्यात 13 ऑक्टोबरला मतदान

 

 

Chandrapurlead newstwo wheeler and four wheeler auction