पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पनवेल 17 नोव्हेंबर :- शुक्रवार दिनांक ११ नोव्हें, २०२२ रोजी पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने धामणी पो. वाजे, ता. पनवेल जिल्हा रायगड येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ८,९ व १०वी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. ह्या शालेय सामुग्रीत अर्धा डझन २००पानी वह्या व भुमिती कंपास बॉक्स प्रत्येक विद्यार्थ्याला न्यासाचे उपाध्यक्ष ताराचंद मेश्राम, न्यासाचे सचिव अनिल मेश्राम, न्यासाचे खजिनदार विश्वनाथ जांभूळकर आणि न्यासाचे सल्लागार डॉ गंगाधर मेश्राम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेचे शिक्षक पंकज गायकर यांनी प्रास्ताविक करून न्यासाच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शालेयपयोगी वस्तुचे वाटप करण्यापूर्वी पारमिता धर्मादाय न्यासाचे उपाध्यक्ष ताराचंद मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, चांगला अभ्यास करून आयुष्यात सफल होण्यासाठी चिकाटी, कसोटी, सातत्य फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे सुत्र अमलात आणली पाहिजे. न्यासाचे सल्लागार प्राचार्य डॉ गंगाधर मेश्राम हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, दिलेल्या शालेयपयोगी वस्तुंचा सर्वांनी भरपूर उपयोग करावा.

कारण तुम्ही केलेल्या असल्याचे गुणांकन तुम्ही परिक्षेत उत्तर पत्रिकेत काय लिहितो त्यावरच अवलंबून असते.म्हणून वाचलेले वहीत लिहून काढा. लिहिण्याचा सराव उत्तर पत्रिका सोडवताना उपयोगात येतो. शेवटी इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना मार्चमध्ये होणाऱ्या शालांत परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका नूतन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

हे पण वाचा :-