महिला रुग्णालयातील बालरुग्णांच्या वॉर्डच्या भिंती झाल्या विविध रंगात रंगून झाल्या बोलक्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रत्नगिरी दि.१९ जून  :-  रुग्णालय म्हटले की,आपल्या काळजीत भरच पडते कारण रुग्णालयात भरती होणे कुणालाच आवडत नाही. त्यासोबत तेथील वातावरण ही निरस असते .मनोरंजन नावाची गोष्ट तर दूरच..लहान मुलांना तर रुग्णालयात भरती होणे म्हटले तर नकोस वाटत. मात्र,रत्नागिरी येथील महिला रुग्णालयातील बाल रुग्णांच्या वार्डातील उदासवाण्या भिंती रंगात रंगून बोलक्या झाल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असतांना लहान मुलांना याचा तडाखा बसण्याची शक्यता असताना त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.कोरोना बाधित लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काही कलरफुल बघायला मिळालं तर उपचार घेण सुसह्य होईल अश्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संघमित्रा फुले आणि रत्नागिरीच्या नेहा साळवी व ऐश्वर्या गावकर यांनी या वॉर्डला कलरफुल केलं.

रत्नागिरी जिल्ह्यातील असा हा पहिलाच कलरफुल पेडिअट्रिक वॉर्ड असून या संकल्पनेच सर्वचजण कौतुक करत अन्य तालुक्यातून देखील असा वॉर्ड व्हावा अशी मागणी होत आहे. जेणेकरून, आयुष्याचे रंग बेरंग करणाऱ्या या कोरोनाने बाधित होणारे चिमुकले जीव या रंगीत, जिवंत भिंतीमधून नक्कीच उमेदीची उत्साहाची पालवी शोधू शकतील.

हे देखील वाचा.

छत्तीसगड मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत एक नक्षली महिला ठार

धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

lead storiratnagiri cs rajesh tope