स्टार्टअप यात्रेच्या दुसर्या टप्प्याचे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर स्पर्धा संपन्न

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योजकांच्या सादरीकरण स्पर्धेत जिल्हास्तरावर तीन विजेते, प्रथम पारितोषिक आदिवासी लक्ष्मी स्वयंसहायता समुह, द्वितीय पारितोषिक अंकुश गांगरेड्डीवार तर तृतीय पारितोषिक जयंत राउत यांना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 17 ऑक्टोबर :- जिल्ह्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र उद्योजकता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या नेतृत्वाखाली प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या दुसर्या टप्प्यात नवसंशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे एक दिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत जिल्हास्तरावर तीन विजेते घोषित करण्यात आले. यामध्ये जिलास्तरावर उत्कृष्ट सादरीकरणामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 25 हजारासाठी गौनवनोउपज मायनर फुड प्राॅडक्ट या नव संकल्पनेसाठी आदिवासी लक्ष्मी स्वयंसहायता समुह, मु. जीवनगट् टा ता. एटापल्ली जि. गडचिरोली, द्वितीय पारितोषिक 15 हजारांसाठी नवकौशल्य नव संकल्पनेसाठी अंकुश गांगरेड्डीवार गडचिरोली यांना तर तृतीय पारितोषिक 10 हजारांसाठी इलेक्ट्राॅनिक आॅटो स्विचिंग फाॅर ब्ल्यूटूथ मोबाईल या नव संकल्पनेसाठी जयंत राउत मु.पो. पारडा जि. गडचिरोली यांना देण्यात आले.

स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राच्या मुख्य टप्प्यामध्ये प्रास्ताविक व विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती, स्थानीक स्टार्टअप, उद्योजकाची व्याख्याने, स्टार्टअप व नवउद्योजकता कार्यशाळेचे विषय, सादरीकरण सत्र व मुल्यांकन इत्यादीची माहित देण्यात आली. जिल्ह्यातील एकुण 35 आॅनलाईन अर्जदारांपैकी 26 नवउद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्थ अर्जदारांनी नव संशोधन केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण शिबिर स्पर्धेचे प्रथम व द्वितीय असे दोन सत्र करण्यात आले होते. सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती, स्टार्टअपचा प्रवास तसेच स्थानिक उद्योजकांची व्याख्य झालेत.

दुसर्या सत्रात दुपारी 12.45 वाजता नवउद्योजकांना सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली व प्र्रत्येक सहभागी नवउद्योजकास 10 मिनीट सादरीकरण करण्याची संधी मिळाली. यामध्ये 5 मिनीट सादरीकरण व 5 मिनीट प्रश्नोत्तरासाठी ठेवण्यात आले होते.

हे पण वाचा :-

चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर ! खुनातील 12 पैकी 6 आरोपी अल्पवयीन

अंधेरीत भाजपची माघार ..पण अपक्ष उमेदवारांचे काय ?

compititiondistrictGadchirolilevel