रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे- नीलम गोरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 26 नोव्हेंबर :-  रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे असे शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो.

मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते असेही डॉ गोऱ्हे यांनी म्हटले आहे. योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते.

हे देखील वाचा :-

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

मुलचेरा तालुक्यात बालविवाह रोखला

खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

Dr. Neelam Gorhemumbairamdev baba