लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
एटापल्ली, दि. २८ फेब्रुवारी : एटापल्ली येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची रविवारी आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या सुचनेनुसार अहेरी विधानसभा क्षेत्र महिला निरीक्षक ग्यानकुमारी कौशी व एटापल्ली तालुका महिला निरीक्षक सरला मूडावार यांनी एटापल्ली तालुक्याचा दौरा दरम्यान शहर व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीत संवाद साधून पक्ष संघटन मजबुत करण्यावर चर्चा करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी बूथ कमिट्या बनवून त्या सक्रिय करण्यावर भर देण्याचे या आढावा बैठकीत महिला पदाधिकार्यांना निर्देश देण्यात आले.
या आढावा बैठकीला एटापल्ली महिला तालुका अध्यक्षा ललिता मडावी व शहर अध्यक्ष पोर्णिमा श्रीरामवार व महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा :