सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : ३ ऑगस्ट,

शासकीय हत्ती कॅम्प कमलापुर येथील सई नामक हत्तीचे आज पहाटे च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला होता त्यामुळे वन्यजीवप्रेमी व वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मृत सई हत्तीणीचे शवविच्छेदन अहेरी पंचायत समिती चे पशुधन विकास पशु वैद्यकीय अधिकारी अहेरी व पशुधन विकास अधिकारी एटापल्ली  व वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.यामध्ये सई चा मृत्यू कार्डीओ व्हॅस्क्यूलर फेल्यूअर मुळे झाल्याचे सांगण्यात आले. तसेच तपासणी नंतर सईच्या शरीरावर कोणतेही गंभीर जखमा आढळुन आले नाहीत. तसेच तीचा मृत्यू विषबाधेनेही झालेला नसल्याचे प्राथमिक तपासणीतुन दिसुन आले. हत्ती हा प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सुची -1 मधील प्राणी असल्यामुळे त्याच्या मृत्यू बाबत वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9 नुसार प्राथमिक वनगुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या वनगुन्हयाची चौकशी सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.अशी माहिती कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांनी आज संध्याकाळी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात  पुढे म्हटले आहे कि, मृत्यूपूर्वी सई हत्तीला कोणताही गंभीर आजार नव्हता तसेच तिच्यावर कुठल्याही प्रकारचे औषधोपचारसुध्दा सुरु नव्हता. परंतु अचानक काल दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी शासकीय हत्ती कॅम्प येथील महावतांना ती चारा खात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जवळुन पाहिले असता, तीची हालचाल मंदावती होती.या बाबत महावतांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापुर आणि उपविभागीय वन अधिकारी अहेरी, यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी,अहेरी यांना बोलविण्यात आले. नंतर तिच्यावर डॉक्टरांनी उपचारही केला. उपचारानंतर सई हत्ती सुस्थितीत दिसुन आली व आपल्या पायावर उभे राहुन तिच्या परिवारातील इतर हत्तींबरोबर जंगलामध्ये निघुन गेली.आज मंगळवारी सकाळी 6 वाजता सई जागेवर पडुन असल्याचे महावतांना दिसताच त्यांनीजवळ जावुन बघितले असता, तो मृत असल्याचे दिसुन आले. या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापुर आणि उपविभागीय वन अधिकारी अहेरी यांना कळविण्यात आले. नंतर पशुधन विकास अधिकारी अहेरी, पंचायत समिती, पशु वैद्यकीय अधिकारी अहेरी व पशुधन विकास अधिकारी एटापल्ली यांना तपासणी व शवविच्छेदनासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार तपासणी करुन शवविच्छेदन केले. तपासणी नंतर सईच्या शरीरावर कोणतेही गंभीर जखमा आढळुन आले नाहीत. तसेच तीचा मृत्यू विषबाधेनेही झालेला नसल्याचे प्राथमिक तपासणीतुन दिसुन आले. शवविच्छेदनावरुन सई चा मृत्यू कार्डीओ व्हॅस्क्यूलर फेल्यूअर मुळे झाल्याचे सांगण्यात आले. पुढील सखोल तपासणी करीता शवविच्छेदनामध्ये काढण्यात आलेले अवयवांचे नमुने चंद्रपुर व नागपुर येथील लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे.

यावेळी सर्व सोपस्कार पार पाडताना  सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक  सुमित कुमार ,सहायक उपवनसंरक्षक एस .एस .पवार ,कमलापूर वन परिक्षेत्र अधिकारी घुगे  आदीची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

 

 

gadchiroliforestKamlapurHattiCampsaielephanatdeathcase