लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपुर : जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील ६ जणांचा जनरेटर धूर गळतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुर्गापूर येथे घडली आहे.
मृतकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतकांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.
दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. दरम्यान डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यु झाल्याचे सांगत आहे. रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला, वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता, रात्री पाऊस सुरू झाल्याने जनरेटर सुद्धा घराच्या आतील भागात ठेवण्यात आला असल्याने त्यामधून निघणारा धूर लष्कर कुटुंबासाठी जीवघेणे ठरले.
त्या धुरामुळे ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली असून कुटुंबातील १ सदस्य यामधून बचावला असून त्यांचेवर डॉक्टर विश्वास झाडे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच घटनास्थळी दुर्गापूर पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
हे देखील वाचा :
“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?