दरोड्यांचा उद्देशाने आलेल्या आरोपीला शिताफीने अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

ठाणे, दि. २४ नोव्हेंबर : दरोडयाच्या तयारी करून घातपात व मालमत्तेची लुटालुट करण्याचे उददेशाने आलेल्या आरोपीचा प्रयत्न हाणून पाडून आरोपीना शिताफिने अटक करण्यात आली आहे.

दि.१९/११/२०२२ रोजी पहाटे ०४ : ५० वा. चे सुमारास श्रीनगर पोलीस स्टेशनचे हददीत तपास पथकातील सपोउनि माणिक इंगळे, पो.शि/ ७०१८. धुत्रे, पो.शि./ २८५० शेडगे, पो. शि. १९२/साळुंखे असे साध्या वेशात खाजगी मोटार सायकलने रोड नं.१६ कडून रोड नं.१८ एस कडे रात्रगस्त फिरत असतांना रोड नं. १८ एस येथे आर. के. दत्त कन्सर्न कंपनीच्या भिंतीलगत, वागळे इस्टेट, ठाणे या ठिकाणी एक सिल्वर रंगाची होंडा मोबीलीयो व एक मरूण रंगाची स्विफ्ट डिझायर या वाहनातील इसम १) नवीन चंद्रभान सिंग, वय – २६ वर्षे, २) चंद्रकांत तिमाप्पा पुजारी, वय – ३८वर्षे ३) विश्वजीत विनोद डांगळे, वय – २३वर्षे व ४) जुबेर ५) थॉमस डॅनिय व त्यांचे सोबत असलेले दोन साथीदार हे दरोडा घालण्याचे उद्देशाने एकत्र दबा धरून असतांना त्यांना घेराव घालुन ताब्यात घेतांना १) जुबेर २) थॉमस डॅनिय व त्यांचे सोबत असलेले दोन साथीदार हे तेथुन पळुन गेले. उर्वरीत वरिल अ.नं. १ ते ३ यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडील दोन चारचाकी वाहनांची झडती घेतली असता एक पांढ-या रंगाची लाल व तपकीरी रंगाची लहान फुलांची डिझाईन असलेली कापडी पिशवी मिळाली त्यात एक मोठा स्कु ड्रायव्हर, एकुण ४ कटावणी पैकी दोन अडीच फुट लांबीच्या व दोन दिड फुट लांबीच्या, एक मोठा अॅडजस्टेबल पाना व एक लहान अॅडजस्टेबल पाना, एक १०-१२ नंबरचा पट्टी पाना, एक चाकु, चिकटपट्टी, मिरची पुड, एक जोड हॅन्डग्लोज, कापडी मास्क, काळया रंगाची टोपी, वाहनाच्या दोन नंबर प्लेट KA 51 MH 4015 अश्या एकच नंबरच्या असे साहीत्य जवळ बाळगुन दरोडा घालण्याचे उद्देशाने तयारी केली असतांना मिळुन आल्याचे निष्पन्न झाल्याने सविस्तर पंचनामा करून मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीत १) नवीन चंद्रभान सिंग, वय – २६वर्षे, २) चंद्रकांत तिमाप्पा पुजारी, वय – ३८वर्षे, ३) विश्वजीत विनोद डांगळे, वय – २३वर्षे, तसेच पळुन गेलेले आरोपीत ४) जुबेर २) थॉमस डॅनियल, जुबरे सोबत आलेले दोन साथीदार यांचे विरूध्द श्रीनगर पोलीस स्टेशन गु.रं. नं. २६३ भा.द.वि. कलम ३९९ प्रमाणे दिनांक १९/११/२०२२ रोजी २६ / २०:०७ वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयामध्ये आत्तापर्यंत एकुण ०४ आरोपीना अटक करण्यात आले असुन त्यांची दिनांक- २४/११/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे. सदर गुन्हयातील आरोपीत क्रमांक ४) थॉमस यास अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन अजुन एक वाहन जप्त करण्यात आले त्या कारवरील चेसिज् नंबरचे आधारे शोध घेतला असता सदर वाहनाचा क्रमांक यांनी एमएच.०४ जीएम. ९७२४ असा असुन सदर वाहन हे दिनांक १४/११/२०२२ रोजी मॅन्गलोर साउथ पोलीस स्टेशन कर्नाटक येथुन घरफोडी करतांना चोरून नेल्याचे गुन्हयात निष्पन्न झाले आहे.

गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी जुबेर यांचे शोधाकामी एक तपासपथक हे कर्नाटक व केरळ राज्यात पाठविण्यात आले असुन सदर गुन्हेगारांची चारित्र पडताळणी करता ते सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन आले आहे. तसेच त्यांचा आंतरराज्य टोळी असल्याचा खुलासा झाला आहे.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे (गुन्हे) हे करीत आहेत यातील मिळुन आलेल्या आरोपींचे सी.सी.टी.एन.एस. वरून गुहेगारी पार्श्वभुमी तपासुन पहाता त्यांचे विरूध्द महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे. अटक आरोपीत यांचेकडे तपास करून इतर पाहीजे असलेले आरोपीत यांचा शोध घेवुन त्यांना अटक करीत आहोत.

सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ५, वागळे इस्टेट, ठाणे अगरसिंग जाधव मा. सहायक पोलीस आयुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे गजानन काब्दुले, श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहा. पो.उप निरी. माणिक इंगळे, पोहवा / तानाजी खोत, पोहवा/अनिल राठोड, पोना / सुनिल धोंडे, पोना / मुकिंद राठोड, पो. शि./ विनोद साळुंखे, राकेश पवार, निलेश शेडगे, निलेश धुत्रे, महेश झांझुर्णे, यांनी पार पाडली आहे.

हे देखील वाचा : 

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना