संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद १८ ऑगस्ट : उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथे चक्क संस्था चालकाच्या शेतात शिपाई काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहेत.

संस्थाचालकाने शाळेतील शिपायां कडून शेतामध्ये कांदा लागवड करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या संचालकाविरुद्ध या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. घाटंग्री येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्याधन प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. हि शाळा भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून वसतिगृह देखील येथे आहे.या शाळेचे गुलाब जाधव हे संस्था चालक आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असली तरी कर्मचारी आणि शिक्षक यांना दररोज शाळेत यावे लागते.या प्रकरणी गावातील अरविंद राठोड यांनी हा व्हिडिओ कडून जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली असून संस्था चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा :

आमदाराचे आश्वासन ठरले फोल,भूमिपूजन करून 3 वर्षे लोटूनही फराडा,फोकुर्डी रस्त्याची दुरव्यथाच..नागरिकांचा आमदाराप्रति रोष.

 

बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा,बनावटी पोलीस प्रचार आहे, माओवादी पार्टी चा याच्याशी कसलाही संबंध नाही.

 

 

बिबट्याच्या हल्लात गुराखी जखमी

osmanabad