आमदाराचे आश्वासन ठरले फोल,भूमिपूजन करून 3 वर्षे लोटूनही फराडा,फोकुर्डी रस्त्याची दुरव्यथाच..नागरिकांचा आमदाराप्रति रोष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १८ ऑगस्ट: राजकीय नेतेमंडळी  निवडणूक जवळ आली की,नागरिकांना विविध प्रकारचे आश्वासन देतात.यात नवे काही नाही निवडणुकीत मत मिळवण्यासाठी राजकीय लोकांनी आजमावलेला हा फंडा असतो. नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधानपूर्ती करणे गरजेचे असते मात्र, काही राजकीय नेतेमंडळीना  निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा साफ विसर पडतो. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या रोशाला ही त्यांना सामोरे जावे लागते.

 

अश्याच एका प्रकाराची प्रचिती चामोर्शी तालुक्यातील फराडा याठिकाणी आली आहे. येथील विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी दिलेले आश्वासनच फोल ठरले आहे असा आरोप चामोर्शी तालुक्यातील फराडा गावातील नागरिकांनी केला आहे .

झाले असे की गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदारांनी तीन वर्षापूर्वी फराडा,फोकुर्डी रस्त्याचे भूमिपूजन केले होते. लवकरच येथील नागरिकांना लवकरच ह्या रोड चे बांधकाम सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना आमदारकी ची लॉटरी लागली.मात्र,आमदार महोदयांना फराडा वासीयांना दिलेल्या आश्वासनाचा साफ विसर पडला.

येथील नागरिकांच्या म्हणन्यानुसार ,त्यांनी आमच्या गावात येऊन तीनवेळा नारळ फोडले (म्हणजे भूमिपूजन केले) व सांगितले की,रोड मंजूर झाला आहे 10 ते 15 दिवसात काम सुरू करतो मात्र त्यालाही बराच मोठा कालावधी लोटला आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे आमदार साहेबांना आपल्या आश्वासनाची पुरता विसर पडला आहे.

या मार्गावर पक्का रोड नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना ये-जा करायला मोठी अडचण होत आहे.पावसाळ्यात  मोठमोठाले गड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आता तरी आमदार साहेबांना आपल्या आश्वासनाची आठवण येईल काय??असा प्रश्न फराडा येथील नागरिक विचारत आहेत.

हे देखील वाचा :

बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा,बनावटी पोलीस प्रचार आहे, माओवादी पार्टी चा याच्याशी कसलाही संबंध नाही.

 

 

बिबट्याच्या हल्लात गुराखी जखमी

 

मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई

assurancefollychamorshifaradagadchirolimlaholi