मुक्या जनावरांंवर असंही प्रेम की, त्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ, दि. ३ नोव्हेंबर :  यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात कारण त्यांची गोसेवा हीच मुक्या प्राण्यांसाठी लळा लावणारी ठरली आहे .

नेर येथे संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत ते गोरक्षण चे कार्य मागील २५ वर्षांपासून करीत आहेत पवन जैस्वाल हे नेर नगर परिषद चे उपनगराध्यक्ष आहेत कधी कत्तलीसाठी जाणारे जनावरे पोलीस पकडतात तेव्हा पोलीस त्यांच्याकडे कधी ही जनावरे आणतात तर कधी शेतकरी यांच्या कडील जनावरे जैस्वाल यांच्या कडे आणून देतात आणि त्यासर्वांची स्वतः काळजी घेऊन सांभाळ करतात .

आज त्यांच्याकडे चारशे च्या जवळ गाई आणि जनावरे आहेंत. गावाकडे ग्रामस्थांना महागाई च्या काळात सध्या जनावरे पालन करणे कठीण झाले आहे अशावेळी काही व्यक्ती त्यांच्या कडीलजनावरे जैस्वाल यांच्या कडे आणून सोडतात खरे तर प्रत्येकाने एक दोन गाईंचे पालन केल्यास गाव खेड्यात शेती परिसर नंदनवन होईल असा विश्वास जैस्वाल यांना आहे यासाठी प्रत्येकाने गाई चे पालन करावे असे त्यांचे म्हणणे आहे .

कधी आजारी आलेल्या गाईंची येथे नीट काळजी घेतली जाते गाईंना ढेप आणि चारा भरपूर प्रमाणात मिळावा यासाठी जैस्वाल स्वतः लक्ष देतात त्यांनी गाईंना बारामही चारा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी 5 एकर मध्ये चारा पिकांची लागवड केली आहे.

तो चारा वर्षभर जनावरांना पुरेसा होतो .येथील गाईच्या गोठ्याची स्वच्छता करणे आणि चारायला घेऊन जाण्यासाठी १० व्यक्ती येथे मदत करत असतात
संत उध्दव बाबा यांच्या मंदिरात कधी येथे गाई म्हशी आणि बकऱ्या मेंढ्या सुध्दा लोक आणून सोडल्या आहेत त्यांचेही संगोपन पवन जैस्वाल हे करतात .

येथे १२ हजार चौरस फुटावर गोठा असुन तेथे गाईंची देखभाल केली जाते उन्हाळ्यात गाई ना हिरवा चारा मिळेल अशी व्यवस्था केली जाते .विशेष म्हणजे पवन जैस्वाल यांचा आवाज ऐकताच या गाई हंबरडा फोडतात त्यांच्याकडे गाई धावून येतात आपुलकी आणि माये मुळेच ते सर्व शक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा :

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी

सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

animal loverpawan jaiswalYawatmal District