सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क;

वाशिम, दि. 03 नोव्हेंबर  :  जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याबाबत तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत.कोविड-19 प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बधामध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरीक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरीकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड -19 बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला. कोविड-19 बाधेच्या लाटेची शिसक्ती टाळण्यासाठी शासनाने सर्व शासकीय,निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व परीसरात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस यांनी आदेश पारीत केले आहे. सदर आदेश पुढीलप्रमाणे आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पुर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख/ आस्थापना प्रमुख यांनी करावी. व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पुर्ण होईल याची खातरजमा करावी. सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुखांची आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याचे नामनिर्देशित करावे. त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित अभ्यागत,अधिकारी व कर्मचारी ज्या विभागाच्या क्षेत्रात आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेले अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील. सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देतील. सक्षम प्राधिकाऱ्याने दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या  आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी दंडाची रक्कम, महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा 0070-इतर प्रशासनिक सेवा 800 इतर जमा रक्कम या लेखाशिर्षाखाली  शासन खाती जमा करावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे अध्यक्ष षण्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा,

बेस्ट आर्टीस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित

पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे अभिवादन.

dio washim