उर्मिला मातोंडकरानी महाड पुरग्रस्त भागात जाणल्या महिलांच्या व्यथा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रायगड : रायगड सह कोकणात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन विस्कळीत केले. घरातील सर्व साहित्य वाहून गेले, लोकांपुढे खायला अन्न व पाणी देखील नव्हते, पूर्णपणे शहर आणि आजूबाजूच्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यासाठी सेवाभावी संस्था व  सामाजिक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त लोकांना मदत केली जात आहे.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याने आज महाड शहराची पाहणी करत पूरग्रस्तांची विचारपूस केली त्यांच्यासोबत स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले उपस्थित होते.

यावेळी त्यांनी  पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य कीट चे वाटप करण्यात आले. “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उद्धवजी ठाकरे सारखे अत्यंत कार्यकुशल व सक्षम असे नेतृत्व  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  आपल्याला लाभले आहेत हे आपलं भाग्य आहे.”  असे मत त्यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा :

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर