गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा कहर सुरूच मार्कंडा कंसोबाच्या जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षीय मुलगा ठार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 15 सप्टेंबर :  गडचिरोली जिल्ह्यात वाघ्र बळींची संख्या वाढतीवर आहे आज चामोर्शी  तालुक्यातील आष्टी पासून ३ किलोमीटर अंतरावर मार्कंडा कंसोबा जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षोय मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

     मनोज तिरुपती देवावार वय ७ वर्ष रा. भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपूर असे मृतक मुलाचे नाव आहे.   दिनांक १५ सप्टेंबर ला दुपारी तीन वाजता वनविकास महामंडळ मार्कंडाच्या अंतर्गत येत असलेल्या कंपारमेन्ट क्षेत्र २१७ च्या जंगल परिसरात मेंढ्या चराईसाठी मेंढपाळ कुटूंबीय वास्तव्य करून होते. त्या ठिकाणी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बिबट्याने मनोज तिरुपती देवावार या बालकांवर हल्ला करून जंगल परिसरात फरपटत नेले व ठार केले. जवळच असलेल्या मनोजच्या आजोबांनी बिबट्याचा पाठलाग केला.आणि बिबट्याला परतवून लावले पण तोपर्यंत मुलाचा जीव गेला होता. दोन दिवसांपूर्वीच पेपर मिल कॉलनीत बिबट्याने बालकाला जखमी केले.आणि  आता दोन दिवसांतच बिबट्याने या मुलाला ठार केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.

     या बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी वनविभागाकडे वारंवार करूनही वनविभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे  नागरिकांनी वनविभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा,

कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला घरात; वृद्ध महिलेच्या समयसूचकतेने बिबट्याला केले जेरबंद

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

 

 

cf dr kishor mankar pccf reddi cmo CM Uddhav ThackareyClead stori M Uddhav Thakareygadchiroli forestleopradkilling