कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला घरात; वृद्ध महिलेच्या समयसूचकतेने बिबट्याला केले जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,१६ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना  बिबट्या घरात शिरल्याची घटना बुधवारी पहाटे ४:३० च्या दरम्यान घडली. या घटनेची माहीती वनविभागाला प्राप्त होताच वन विभागाच्या एका चमूने घटनेच्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले.

बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मेटेजांगदा या गावालगत आला असता कुत्रा समोर दिसतात शिकारीसाठी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी चक्क कुत्र्याने वृद्ध महिला असलेल्या मैनाबाई यांच्या घरात प्रवेश केला. पाठोपाठ बिबट्याने ही घरात प्रवेश करताच जोरजोरात  किंचाळ्या मारून भोकने सुरू केले. त्यावेळी मैनाबाई यांनी क्षणाचा विलंब न करता मोठ्या शिताफीने घटनेचे गांभीर्य ओळखून बाहेर निघाल्या आणि  त्यांच्या पाठोपाठ कुत्राही निघाला . त्यावेळी मैनाबाई ने चक्क दाराची कडी लावल्याने बिबट्या आतमध्येच अटकताच या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली .

आधीच वनविभाग  नरभक्षक वाघामुळे कोंडीत सापडले असताना हि घटना समोर आल्याने  घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या बिबट्यांला पकडण्यासाठी  सध्या गडचिरोली तालुक्यात आलेल्या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी आलेली चमू उपलब्ध असल्याने नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्वच्या चमूला सकाळीच मेटेजांगदा या गावी पाठवण्यात आले. त्यावेळी दुपारच्या १२:३० सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

या घटनेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक ,वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही व्ही मेंढेवारसह वन कर्मचार्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश येऊन सुटकेचा मोकळा श्वास घेतला.

हे देखील वाचा,

गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा कहर सुरूच मार्कंडा कंसोबाच्या जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षीय मुलगा ठार.

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

cf dr kishor mankar pccf reddi cmo CM Uddhav Thackareylead newsCM Uddha Thakaray