56 वर्षीय आजीने दिला बाळाला जन्म

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमेरीका, 06 नोव्हेंबर :- जगात अनेक आश्चर्यकारक घटना आणि चमत्कार होत असतात. यावर लगेच विश्वास ठेवणे थोडे कठीण होते. किंवा विश्वासच ठेवू शकत नाहीत. विशेषत विज्ञानाच्या प्रगतीनंतर अद्भूत करणार्रूा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, या ठिकाणी अशी एक घटना समोर आली आहे जी सगळ्या बाबींवरून वेगळी ठरते. अमेरीकेतील नॅन्सी हाॅक या 56 वर्षीय आजीने चक्क बाळाला जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या मुलाला लहानाचे मोठे केले नॅन्सी तिच्याय मुलाच्या बाळाची आई झाली आहे.

या जगात आल्यानंतर प्रत्येकाला आजी-आजोबाचे प्रेम हव असते. कारण त्या प्रेमामध्ये मायेचा ओलावा असतो. तसेच घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून आजी कायम आपल्या नातवंडांवर जास्तच प्रेम करते. मात्र, अमेरिकेतील उटाह शहरात राहणारी नॅन्सी हाॅक ही सर्वसामान्य आजीपेक्षा वेगळी आहे. या आजीने स्वतच आप्ल्या नातवाला जन्म दिला आहे.

नॅन्सीची सून कॅम्ब्रिया ही हिस्टेरेक्टाॅती प्रक्रियेनंतर कोणत्याही बाळाला जन्म नाही देउ शकत. कारण तीचे गर्भाशय तिच्या शरीरापासून वेगळे झाले होते. 32 वर्षीय जेफ हा व्यवसायाने वेब डेव्हलपर आहे. अशा परिस्थितीत जर मुल हवे असेल तर सरोगसीच्या माध्यमातून आपल्यामुलाला जगात आणणे हा एकचा पर्याय त्यांच्या जवळ होता. तेव्हा नॅन्सी ने ही जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या निर्णयाशी खुपच आनंदी आहे. नॅन्सीने यापूर्वी पाच निरोगी मुलांना जन्म दिला आहे.

हे पण वाचा :-

gave birthgrandmotherto a baby