रानटी हत्तींचा उच्छाद! “त्या” रानटी हत्तीने घेतला तिसरा इसमाचा बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि २५ : जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे, आधी वाघांचा उच्छाद त्यानंतर दोन ते अडीच वर्षापासून ओडिशातून छत्तीसगड मार्ग गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले रानटी हत्तींची उच्छाद सुरूच असून पुन्हा तिसऱ्या इसमाचा बळी घेतला आहे .

सिरोंचा ,आलापल्ली, वन विभागात “त्या ” रानटी हत्तीने धुमाकूळ करीत नुकताच भामरागड वनविभागातील गट्टा वन वनपरिक्षेत्रातील कियर येथे प्रवेश करून धुमाकूळ घातला असल्याने  नागरिक ही भयभीत होवून पाहू लागले, दरम्यान त्याच ठिकाणी  “त्या “ रानटी हत्तीच्यां तावडीत सापडल्याने गोंगलू रामा तेलामी (५३) याचा जागीच जागीच मृत्यू झाला असून  ते भामरागड तालुक्यातील कीयर येथील रहिवासी आहे.

भामरागड वन  विभागाला माहिती मिळताच उपवनसंरक्षक शैलेश मीना,  वन वनपरिक्षेत्र अधिकारी,गट्टा योगेश शेरेकर तसेच वन कर्मचारी घटनास्थळावर दाखल होवून कियर तसेच आजूबाजूच्या गावातील  नागरिकांना सूचना ,दिवंडी देवून सतर्क केले होते .दरम्यान मृतक गोंगलू रामा तेलामी याला रानटी हती मागच्या बाजूने आहे कळले नाही आणि थेट हत्तिच्या तावडीत सापडला.स्थानिक वन कर्मचारी तसेच  नागरिकांनी आरडाओरड केली. तो पर्यंत रानटी  हत्तीने मृतक गोंगलू रामा तेलामी जागीच ठार केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करीत शवविच्छेदानासाठी भामरागड रुग्नणालयात पाठविले आहे ,तर दुसरीकडे वन अधिकार्यांनी नागरिकाना सतर्क राहण्यासाठी सांगितले असून त्या  रानटी हत्तीच्या हालचालीवर बारीक  लक्ष ठेवले जाणार आहे.

रानटी हत्तीचां  रेकी करण्याचा प्रयत्न …

३ एप्रिल रोजी सकाळ च्या सुमारास मुलचेरा तालुक्यात दाखल होवून प्राणहिता नदी ओलांडून जंगली हत्तीने तेलंगणा राज्यात प्रवेश करीत कुमरमभीम जिल्ह्यातील चितलमानेपल्ली तालुक्यात बुरेपल्ली येथे मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या अल्लुरी शंकर, त्यानंतर ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भाताच्या शेतीत काम करणाऱ्या कारू पोशण्णा नामक शेतकऱ्याला ठार केले. २४ तासात दोन शेतकऱ्यांचा बळी घेवून ६ एप्रिल रोजी जंगली हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून रेपनपल्ली (प्राणहिता) वनपरिक्षेत्रात १८ दिवस मुक्काम ठोकून एका घराची नासधूस करीत  मंगळवार २३ एप्रिल च्या  रात्री ९ वाजताच्या सुमारास आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून चिरेपल्ली जंगल परिसरात दाखल होवून धुमाकूळ घालत भामरागड वन विभागात दाखल झाला आहे, वन विभाग रानटी हतीच्या मार्गावर असून पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत .

रानटी हत्तीच्या बारीक सारीक हालचालीवर  लक्ष असून वन अधिकारी कर्मचारी त्या  मार्गावर आहेत , कुठलाही अनुश्चीत प्रकार होऊ नये यासाठी वन कर्मचार्याना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहे . 

रमेश कुमार

मुख्य वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली

 

 

 

 

rahul सिंग तोलियाआशिष minaपूनम पातेमहाराष्ट्र फोरेस्तरमेश कुमार मुख्य वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली
Comments (0)
Add Comment