लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
टांझानिया, 06 नोव्हेंबर :- टांझानियामध्ये एक प्रवासी विमान तलावात कोसळले आहे. या विमानात 49 प्रवासी होते. अपघातग्रस्त विमान व्हिक्टोरिया तलावात कोसळले आहे. यातील 23 प्रवाशांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात रविवारी एक प्रवासी विमान कोसळले. यामध्ये आतापर्यंत 23 जणांना वाचविण्यात यश आले आहे. मवांझा ते बुकोबा हे विमान कोसळले आहे. या विमानात 49 प्रवासी होते. टांझानियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे रविवारी पहाटे एक प्रवासी विमान व्हिक्टोरिया तलावात कोेसळले. हे विमान वायव्यकडील बुकाबा शहरात उतरणार हात. त्याच दरम्यान ह अपाात झाला. यासोेबतच प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विमान कोसळल्यानंतर ते तलावात बुडाले आहे. बोेटीच्या सहाय्याने सुरक्षा दलाचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका प्रिजिन एअरच्या विमानाला अपघात झाला. विमानातील प्रवाशांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती तत्काळ मिळालेेली नाही. परंतु स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार या विमानात 49 लोक होतेे. सुरक्षा पथकांकडून लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून सया परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवाम्पघले यांनी दिली आहे. दरम्यान टांझानियाची सर्वात मोेठी खासगी विमान कंपनी प्रसिजन एअरनेे एक निवेेदन जारी करून अपघातासंबंधी माहिती दिली आहे. बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले असून दोन तासांत अधिक माहिती जाहीर केली जाईल असे एअरलाईन्सने म्हटले आहे.
हे पण वाचा :-