मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार किंमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

जानेवारी २०२२ पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने चप्पल, कपडे, गारमेंट्स यासारख्या उत्पादनावरील सामानाच्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे.

वृत्तसंस्था, दि. २१ नोव्हेंबर : जानेवारी २०२२ पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी एक हजार रुपयापर्यंतच्या किंमतीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. तसेच विनलेल्या कपड्यासह सिथेंटिक यार्न, पाइल कपडे, कंबल, टेंट, टेपेस्ट्री, गलीचा यासारख्या सामानावर १२ टक्के जीएसटी करण्यात आलाय. याशिवाय चपलावरीलही जीएसटी १२ टक्के करण्यात आलाय. त्यामुळे नव्या वर्षात चपलाच्या किंमतीही वाढणार आहेत.

सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनं आधीच हैराण असणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कच्च्या मालाच्या किंमतीसह इतर फॅकिंग आणि यॉर्नमध्ये झालेल्या वाढीमुळे कपड्यांच्या किंमतीमध्ये १५ ते २० टक्केंनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकार याआधी चप्पल-कपडे आणि गारमेंट्सवर पाच टक्के जीएसटी आकारत होती. मात्र, आता यामध्ये वाढ केली आहे. यापुढे यावरील जीएसटी पाच टक्केवरुन वाढवून १२ टक्के करण्यात आलाय. नवे दर २०२२ पासून लागू होणार आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIT) याबातची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या वर्षांत कपडे आणि चप्पल खरेदी करणे महागणार आहे.

जीएसटी काउंसिलने कपडे आणि चप्पलच्या जीएसटीमध्ये वाढ करण्यात यावी, याबाबतची शिफासर केली  होती. त्यानुसार पाच टक्क्याहून १२ टक्के जीएसटी करण्यात आलाय.  सरकारच्या या निर्णायावर क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत आहेत.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!

चक्क! गांजा पिकवण्यासाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

 

gst hikelead newsmodi governments