पाकिस्तानची निदा दार ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 08 नोव्हेंबर :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडल आयसीसी कडून नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार ने बाजी मारली आहे. यात तीन खेळाडूंचे नाव नाॅमीनेट करण्यात आले होते. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा राॅड्रीग्स आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांचे नाव नाॅमीनेट करण्यात आले होते. पुरूष कॅटेगरीमध्ये विराट कोहलीने बाजी मारली आहे.

नुकताच महिला आशिया चषक पार पडला. यात भारताने दमदार खेळ दाखवत ट्राॅफी उचलली. सर्वच महिलांनी चांगला खेळ दाखवला. पण पाकिस्तानच्या निदा दार चा खेळ अप्रतिम होता. तिने 6 सामन्यात 145 धावा ठोकत 8 विकेट्स घेतल्या. तिच्या या स्टार अष्टपैलू खेळाच्या जोरावरच तिचे नाव नाॅमिनेट करण्यात आले होते. आशिया कप मध्येच भारताची युवा फलंदाज जेमिमा राॅड्रीग्ज ने काही सामन्यात दमदार फलंदाजी केली होती तर अष्टपैलू दिप्ती शर्मा ने बर्याच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. ज्यामुळे या दोघींना ही नाॅमीनेट करण्यात आले होते. पण अखेर प्रेक्षकांनी निदाला पसंती दिल्यामुळे महिला कॅटेगरीत आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार ने निदाला सन्मानित करण्यात आले.

हे पण वाचा :-

'ICC PlayerNida Darof the Month'