नोकरी गेल्यामुळे 57 टक्के लोकांनी मुंबई सोडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 31 जानेवारी : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित “मुंबईत कोविड-19 चा परिणाम – उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन यांबाबत नागरिकांचे सर्वेक्षण हा प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे.

सर्वच क्षेत्रातील उपजिविका आणि रोजगाराला फटका बसलेला आहे.  टाळेबंदीमुळे नोकरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रत्येक तीन व्यक्तीपैकी दोघांनी सांगितले आहे.  नोकरीवर प्रतिकूल प्रभाव पडला असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या ही 36 टक्के आहे तर 28 टक्के लोकांचा पगार कमी केला गेला.  25 टक्के लोकांनी बिनपगारी काम केले आणि 13 टक्के लोकांनी जादा तास काम केल किंवा त्यांच्यावरील कामाचा भार वाढला’, अशी माहिती प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल गुरुवार, दिनांक 28 जानेवारी रोजी प्रकाशित झाला. महामारी व लॉकडाऊनमुळे शहराच्या सामाजिक-राजकीय व आर्थिक परिस्थितीवर बराच प्रभाव पडल्याचे जाणवल्याने या प्रभावाचे नेमकेपणाने विश्लेषण करण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले.

‘कोविड रूग्णांवरील उपचाराचा मुख्य भार सरकारी दवाखान्यांनी उचलला आहे. याआधी प्रकाशित केलेल्या ‘आरोग्यविषयक सद्यस्थिती 2020’ या अहवालात नमूद केल्याप्रमाने टाळेबंदीच्या काळात कोविड व्यतिरिक्त अन्य आजारांच्या कारणानेही कित्येक नागरिक दगावले आहेत. टाळेबंदीच्या काळात कोविडखेरीज अन्य आरोग्य सेवा मिळणे कठीण झाल्याचे 36 टक्के जणांनी सांगितले. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे अन्य उपचारांसाठी कर्मचारी/डॉक्टर उपलब्ध नसणे (70 टक्के) वा आरोग्य सेवा बंद झालेली असणे (58 टक्के)”, असे मेहता यांनी म्हटले.

covid pandamicjob goan