अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई ४ सप्टेंबर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात विकास निधी किंवा GST परताव्याबाबत आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते. त्यात केंद्रात सत्तेवर असलेले भाजप नेते महाविकास आघाडी सरकार खोटे आकडे देत असल्याचे सांगून  टार्गेट करतात. मात्र आता माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला 2019 ते 2021 पर्यंतचे GST परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन चव्हाण यांनी मागवलेल्या माहितीत हे उघड झाले आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन चव्हाण यांनी दिनांक ०७/०५/२०२१च्या माहितीचा अधिकारांतर्गत केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला किती GST परतावा येणे आहे याची तपशीलवार माहितीची मागवली होती. त्यावर राज्य सरकार च्या वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य कर सहआयुक्त यांच्या कार्यालयातून माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार, सन २०२०-२१या वर्षातील रु. २४३०५ कोटी रुपये केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. तसेच, सरकारने दिलेल्या जीएसटी परताव्याच्या वसुलीमुळे सन २०१९-२० साठी रु. १०२९ कोटींची सुधारीत नुकसान भरपाई प्रलंबित आहे. त्यामुळे २०१९-२० आणि २०२०-२१ साठी भारत सरकारकडे एकूण प्रलंबित भरपाई रु. २५३३४ कोटी  रुपये येणे बाकी आहे.

हे देखील वाचा :

बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा

 

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

 

वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले

centralgovernmentgstreturnmahavikasaghadirighttoinformation