बाबासाहेबांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि.१५ एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून केवळ आपली जबाबदारी संपत नाही तर बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल तरच त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेत, नवीन पिढीला दिशा देता येईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.

जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गौणवन उपज प्रकल्पा अतंर्गत ग्रामसभेच्या प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, केशव गुरुनुले, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबादचे संजय मंडल आदी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, समाजातील स्त्रीयांची कितपत प्रगती झाली आहे, त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो, हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या मनात स्त्रियांबाबत असलेला आदर स्पष्ट करणारे होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षण घ्यावे आणि स्वतः ला तसेच कुटुंबाला सक्षम करावे.असे
मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार गौणवन उपज प्रकल्प विद्यापीठाचे समन्वयक डॉ . नरेश मडावी यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रामसभा सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खुन तर एकजण गंभीर

बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की – डॉ. दिनकर खरात

19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

 

lead news