मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खुन तर एकजण गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, दि. १५ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खुन तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा शहरातील वसंतराव नाईक काॅलेजच्या समोर घडली आहे.

सचिन थोरात असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे तर सुमेध वाघमारे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे दोघे मिरवणूकीत नाचून अडथळा निर्माण करत असल्याने सचिन आणि सुमेधने त्यांना मिरवणुकीत नाचण्यास विरोध केला. हा राग मनात धरुन किशोर ठाकूर आणि आदिल शेख याने सचिन आणि सुमेधवर चाकुने हल्ला केला आणि फरार झाले. दोघांना ही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सचिन चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर सुमेधवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी किशोर ठाकूर आणि आदिल शेख विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या दोन्ही आरोपीचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

 

lead newsnanded murder