माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये सद्भावना दौडचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, १९ ऑगस्ट :-  युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी, जिल्हा परीषद आणि भारत स्काऊट्स गाईडस यांच्या वतीने सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व शहरातील नागरिकांसाठी सद्भावना दौडचे आयोजन दिनांक २० ऑगस्ट, रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी सद्भावना दौड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.

सद्भावना दौड ३ कि.मी.ची असून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परीषद कार्यालय ते परत जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग असणार आहे.

हे देखील वाचा :-

https://youtu.be/jYGqfPMD-Jkhttps://youtube.com/watch?v=jYGqfPMD-Jk&feature=share

कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत. 

palgharsadbhavana divas