महाराष्ट्राला मिळणार पुन्हा सर्वोच्च मान .

न्या. धनंजय चंद्रचूड होणार पुढील सरन्यायाधीश !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 11,ऑक्टोबर :-  न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे.

विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती. नियमांनुसार, सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी भावी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येते.

विद्यमान सरन्यायाधीश लळित यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळं लळित यांनी चंद्रचूड यांची केंद्राकडे शिफारस केली आहे. लळित यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा देशाला मराठमोळे सरन्यायाधीश लाभणार आहे.

हे देखील वाचा :-

गानली समाजाच्या एकजुटी मुळेच खंडोबा मंदीराचे निर्माण- अजय कंकडालवार

निष्ठावतांच्या आगीची मशाल हाती …

Chief JusticedelhiDhananjay Chandrachud