IND vs AUS 1st Test:- दुसऱ्या दिवशी 7 गडी गमावत भारत 144 धावांच्या आघाडी.

दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला असून भारत 7 गडी गमावत 321 धावा केल्या
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

 नागपुर 10 फेब्रुवारी :- भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना नागपुरात सुरु आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली.ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 177 धावांवर बाद केला, भारत 77 वर 1 बाद अशी अवस्था असताना दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहितच्या शतकानंतर अक्षर आणि जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या दिवसअखेर भारताने 7 गडी गमावत 321 धावा ठोकल्या आहेत.

रोहित आऊट झाल्याने टीम इंडिया डाव गडबडला. रोहित पाठोपाठ केएस भरतही माघारी परतला. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने कांगारुंना बॉलिंगनंतर बॅटिंगने नाचवलं. या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 81 धावांची नाबाद भागीदारी केली. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकही ठोकली.

ऑस्ट्रेलियन फिरकीपटून टॉड मर्फिनं आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. मर्फिनं केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रीकर भारत यांना तंबूचा रस्ता दाखवला. क्रेझाने नागपूरच्या मैदानात नोव्हेंबर 2008 साली 8 गडी बाद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच पदार्पणाच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याच्या यादीत मर्फी ऑस्ट्रेलियाचा 37 वा खेळाडू आहे.

हे पण वाचा :-

1st nagpur testaxar patelIND vs AUS 1st Testravindra jedegaRohit Sharmaनागपूर टेस्ट