IND VS AUS 1st Test Match : पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी धुव्वा उडवला आहे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपुर 11 फेब्रुवारी :- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात  विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात  खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत  4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

9 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलीयाचा हा निर्णय चुकीचा ठरवत अवघ्या 177 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना तंबूत पाठवले. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी रोहित शर्माच शतक, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच अर्धशतक तर शमीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 400 धावा करून सामन्यावर मजबूत पकड बनवली. भारताने सामन्यात तिसऱ्या दिवशी 223 धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलिया संघा समोर तगडे आव्हान ठेवले.

आज ३ दिवस  काय घडल मैदानात:-

223 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच भारतानं धक्के देण्यास सुरुवात केली. स्टार फिरकीपटू आर अश्विनने तब्बल 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या मदतीला जाडेजानंही कमाल गोलंदाजी केली. त्यानंही महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. याशिवाय शमीनं दोन आणि अक्षरनं एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर सर्वबाद करत सामना एक डाव आणि 132 धावांनी भारताला जिंकवून दिला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ अखेरपर्यंत क्रिजवर 25 धावांवर नाबाद राहिला पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने सामना ऑस्ट्रेलियाने गमावला. या विजयासह भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून आता दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे.

हे पण वाचा :-

IND vs AusIndia vs Australia 1st Testindia winVCA Cricket Stadium