मिताली राजनं इतिहास रचला, 10 हजार धावांचा टप्पा पार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 12 मार्च:- भारताची महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजनं इतिहास रचला आहे. मितालीच्या या कामगिरीचं प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. जगात केवळ दोनच महिला क्रिकेटर्सला हा टप्पा पार करता आला आहे.  मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एडवर्ड्सनं  10 हजार 273 धावा केल्या असून एडवर्ड्स निवृत्त झाली आहे. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल अशी चिन्हे आहेत. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तिच्या या कामगिरीबद्दल खूप कौतुक केलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील ती एक महान क्रिकेटपटू असल्याचंही यावेळी सांगायला विसले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज मिताली ठरल्यानं तिचं अभिनंदन केलं आहे.

Indain woman teammitali raj