आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आजपासून सुरूवात

CSK vs KKR सामन्याने IPL 2022 ला आजपासून सुरूवात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि.25 मार्च : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आजपासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहे.

आयपीएल 2022 ला (IPL 2022) आजपासून सुरूवात होत आहे. तर फायनल 29 मे रोजी होणार आहे. मोसमाचा पहिलाच सामना चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. या मोसमात दोन्ही टीम नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर सगळ्यांचंच लक्ष असेल.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 2 टीम वाढल्या आहेत, त्यामुळे टीमची संख्या 10 एवढी झाली आहे. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलच्या नियमांमुळे प्रवास टाळण्यासाठी स्पर्धेच्या लीग स्टेजच्या सामन्यांचं आयोजन मुंबई-पुण्यात करण्यात आलं आहे. मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर आयपीएल सामने होतील.

मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली.

आयपीएलच्या टीमची संख्या वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन झाला, त्यामुळे या मोसमापासून बरेच खेळाडू आता दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसणार आहेत.

या मोसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असेल, तर चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी (MS Dhoni), आरसीबीने (RCB) फाफ डुप्लेसिस, सनरायजर्स हैदराबाने (SRH) केन विलियमसन, राजस्थान रॉयल्सने(Rajasthan Royals) संजू सॅमसन, दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ऋषभ पंत, पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयंक अग्रवाल, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे.

आयपीएलच्या दोन नव्या टीम गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) हार्दिक पांड्या आणि लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) केएल राहुलला कर्णधार केलं आहे.

हे देखील वाचा : 

नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर…काय म्हणाली योगींची बहीण

देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

 

 

 

ipl 2022lead news