टोकियो ऑलिंपिक्स २०२०: भारताची हॉकी, तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन मध्ये उत्साहवर्धक कामगिरी,पदकाच्या आशा वाढल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

टोकियो, २९ जुलै : टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि अर्जेंटिना संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी रियो ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिना संघावर ३-१ ने विजय मिळवला आहे. यासोबतच भारताने पुढच्या उपांत्यपूर्व तिकीट मिळवले आहे.

गुरुवारी (२९ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पुरुष तिरंदाजीत भारताला यश मिळताना दिसत आहे. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि दक्षिण कोरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताच्या अतनू दासने माजी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन-हायकला ६-५ ने पराभवाचं पाणी पाजलं आहे. तसेच त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तो पदकाच्या खूपच जवळ पोहोचला आहे.

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये बुधवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरी गटात हाँगकाँगच्या चेउंग न्गन यी हिला पराभूत करत अंतिम १६ जणींच्या फेरीत (उपउपांत्यपूर्व फेरी) प्रवेश केला आहे. सिंधूने चेउंग न्गन यीला २१-९, २१-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमधील भारताचे आव्हान टिकून राहिले आहे.

ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि जमैका संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून सतीश कुमार, तर जमैकाकडून रिचार्डो ब्राऊन हे आमने- सामने होते. हा सामना सतीशने ४-१ ने जिंकला आहे.

हे देखील वाचा :

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

 

lead storytokyo 2021