Women’s T20 World Cup 2023 – भारत-पाकिस्तान महामुकाबला

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

केपटाऊन 12 फेब्रुवारी :- महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 10 फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिकेत  सुरुवात झाली आहे. आज 12 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.भारत-पाकिस्तानचा सामना कोणत्याही खेळातील असो, प्रत्येकाला या सामन्याची उत्सुकता असते. गेल्या वेळी आशिया कप टी-20 सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने आज भारत मैदानात उतरेल. आज महिला T20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानचा हा पहिला सामना असेल.या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.संध्याकाळी 6 वाजता नाणेफेक होईल.

10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यातील ग्रुप B मध्ये इंग्लंड, आयर्लंड, वेस्टइंडीज सह भारत आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे.

भारताचा टी 20 महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्‍वरी गायकवाड.

या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाची उणीव भासू शकते. बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडली आहे. भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हा सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील.

हे पण वाचा :-

 

India Pak matchT20 world cup 2023woman world cup