अमरावती जिल्ह्यातील बेंबळा नदीच्या पुरात ट्रॅक्टर सह 3 जण गेले वाहून.

ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे तीन व्यक्तींचा जीव धोक्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती 9 ऑगस्ट :- 

अमरावती जिल्ह्यातील बेंबळा नदीच्या पुरात ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरसह पाच व्यक्ती वाहून गेले असून, दोन व्यक्ती बचावले आहेत परंतु तिघांचा शोध अजूनही सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीच्या पुरात ही घटना घडली आहे. ट्रॅक्टर पलटी होऊन यातील ट्रॅक्टरसह पाच व्यक्ती वाहून गेले आहे. त्यामध्ये दोघांना पोहणे येत असल्याने जीव वाचला असून तिघांचा शोध अजूनही लागला नाही. या सबंधित घटनेचे संपूर्ण दृश्य मोबाईल मध्ये कैद झाले आहे. आपण पाहू शकतो की पाण्याचं प्रचंड प्रवाह दिसत असूनही ट्रॅक्टर चालकाने बेजबाबदारपणे पुरातून वाहन नेल्याने ही दुःखद घटना काल सायंकाळी घडली आहे.

यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ येथील सुरेंद्र डोंगरे,तर धर्मापुर येथील शेषराव चावके,मारोती चावले हे वाहून गेले तर येथील अक्षय रामटेके ,नारायण परतेकी बचावले आहेत. सोबतच्या वाहून गेलेल्या तिन्ही लोकांचा शोध DDRF ची टीम घेत आहे.
सर्व नागरिकांना लोकस्पर्श न्यूज कडून विनंती आहे की कोणीही जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये, काल पासून बरसणाऱ्या या पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची पातळीही वाढली असून अनेक मार्गही बंद झाले आहेत त्यामुळे शक्यतो अश्या प्रसंगी प्रवास करणे नागरिकांनी टाळावे.

हे देखील वाचा :-

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

 

amrawatiamrawati accidentTractor accident