राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि, ९ ऑगस्ट : महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकताच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धा आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारतीय संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिंदे व संघटनेचे सचिव राहुल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

यात महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सचिव रवी चर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण दहा सुवर्ण पदक, चार रजत पदक व एक कास्यपदक पटकावले.

या स्पर्धेत नितीन जनगम यांनी सुवर्णपदक, अनन्या सामलवार सुवर्णपदक, कस्तुरी येरनीवार सुवर्णपदक, तेजस्विनी पानपाटे सुवर्णपदक, अथर्व बोडे सुवर्णपदक, वैभव कुंमरे सुवर्णपदक, सुरेश मडावी सुवर्णपदक सनी सलामे सुवर्णपदक, राहुल गायकवाड सुवर्णपदक, रवी चर्लावार सुवर्णपदक, नुपूर बोडे रजत पदक,अरुण सलपाला रजत पदक, अदिश्री बर्डे रजत पदक पटकावले असून या सर्व विजयी स्पर्धकाचे पंजाब युनिव्हर्सिटी चंदिगड येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाले. याचे संपूर्ण श्रेय स्पर्धकांनी अथक परिश्रम घेणारे त्यांचे प्रशिक्षक व गडचिरोली जिल्ह्याचे सचिव रवी चर्लावार यांना दिले.

हे देखील वाचा : 

आरोग्य विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

CWG 2022 पी. व्ही. सिंधूचा ‘गोल्डन’ स्मॅॅश, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक