मोठी बातमी – दीपाली चव्हाण(RFO)आत्महत्या प्रकरण-वनक्षेत्र संचालक रेड्डी व उपवनसंरक्षक प्रमोद शिवकुमार यांच्या वर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शवविच्छेदन गृहाबाहेर कुटुंबीयांचे तीन तासापासून आंदोलन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती दि २६ मार्च :-अमरावती च्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली.

त्यानंतर दिपाली यांना शवविच्छेदनासाठी अमरावती येथिल जिल्हा रुग्णालयात आणले असता चव्हाण कुटुंबीयांनी वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व प्रमोद शिवकुमार उपवनसंरक्षक यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत दीपाली चव्हाण यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका व्यक्त करत दीपाली चव्हाण यांचे कुटुंबीय व काही वनक्षेत्र कर्मचारी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहा बाहेर  ठिय्या मांडून आंदोलन करीत आहे .

शिवकुमार प्रमोद