मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

तेलंगणा राज्यातील भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्याच्या छत्तीसगड-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चार्ला परिसरातील चेन्नापूर जंगलात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलीस जवान आणि  नक्षल्यांत चकमक उडाली. या चकमकीत ६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस जवानांना यश आले असून ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ४ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी चकमक उडाली त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन तीव्र केले असून शोधमोहीम दरम्यान मोठ्या प्रमाणत नक्षल्यांचे शस्त्रसाठासह इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुनील दत्त यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रे हाउंड फोर्सचे जवान आणि  केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. १४१ चे जवानांना तेलंगणातील भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्यातील चार्ला परिसरात नक्षल असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या माहितीवरून चेन्नापूर जंगलात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवीत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानांवर अधांधुंद गोळीबार केला. पोलीस जवानांनीही स्वसंरक्षणार्थ जसाच तसे प्रत्युत्तर देत असतांना पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल जंगलाचा आसरा घेत पसार झाले.

त्यावेळी कोम्बिंग ऑपरेशन तीव्र करून सर्चिंग केले असता घटनास्थळावर ६ नक्षल्यांचे मृतदेह  सापडले असून त्यापैकी एकाची ओळख पटली असून ती नक्षल्यात एलओएस कमांडर असून रजिता असे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नक्षल्यांची ओळख आत्मसमर्पित नक्षल्यांमार्फत करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस जवानांनी घटनास्थळावरून नक्षल्यांचे ३०३ रायफल-२, DBBLs-३ आणि रॉकेट लाँचर-४ आणि नक्षल्यांचे दैनदिन वापरातले साहित्य जप्त करण्यात आले असून ६ नक्षल्यांचे मृतदेह व दैनदिन इतर वस्तू ताब्यात घेऊन अधिक तपास केला जात आहे.

आज झालेल्या चकमकीत पोलीस विभागाला मोठे यश प्राप्त झाले असून नक्षल चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसला आहे. 

 

हे देखील वाचा  : 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू 

उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य