शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे.

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत पाच बैठका कुठल्याही तोडग्याविनाच संपल्या आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 6 डिसेंबर:- दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. सरकार कायद्यातल्या काही बदलांसाठी तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत तर शेतकरी संघटना मात्र कायदा मागेच घ्यावा यासाठी आक्रमक आहेत.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

“8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

aapcongressformer protesttrs