बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

छत्रपती संभाजीनगर दि ८: मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला या जिल्ह्यातील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आज याचा निकाल जाहीर करण्यात आला असुन या संबंधी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च नायालयाने फेटाळली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आज बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण झालं.

संभाजीनगर हे नाव सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी दिल होत मात्र त्यांच्या संपत्तीचा वारसा असणाऱ्यांनी अडीच वर्ष सत्तेत असतानाही नामांतर केलं नाही, सरकार अल्पमतात आल्यानंतर घाईगडबडीत बेकायदेशीर निर्णय घेतला.

मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा असणार आमच सरकार आल्यानंतर आम्ही कायद्याच्या चौकटीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर केले. हा जनभावनेचा विजय असुन मी मा. उच्च न्यायालयाच आभार व्यक्त करतो.

मी सर्व नागरिकांच अभिनंदन करतो व या नामांतराविरोधात ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्यांना या निवडणूकीत जनता गाडून टाकणार व महायुतीचा विजय होईल असा विश्वास पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्ष कॉंग्रेस मधे विलीन होतील या विधानावर बोलताना शिवसेना उबाठा गट कॉंग्रेसमधे कधीच विलीन झालाय.जे पाकिस्तानची भाषा बोलतात, शहिदांचा ( हेमंत करकरे ) करतात, त्या शिवसेना उबाठा गटाची कॉंग्रेस कधीच झाली आहे. फक्त औपचारकीता बाकी राहीली आहे अशी टिका एकनाथ शिंदे यांनी केली.

हे देखील वाचा.

मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य – नितीन गडकरी

तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

ग्रामसडक योजनेच्या कामावर गिट्टीमीश्रीत “चुरी”

 

उस्मानाबादचे नामांतर धाराशिवऔरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई उच्य न्यायालय
Comments (0)
Add Comment